महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विठ्ठल-रुक्मिणीच्या रथयात्रेतून कोरोनाबाबात जनजागृती - मुंबई कोरोना बातमी

पूर्व उपनगरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या एस वॉर्डकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाबाबत जनजागृती करणारी विठ्ठल-रुक्मिणीची रथयात्रा काढण्यात आली आहे.

awareness-about-corona-virus-through-vitthal-rakhumai-rathyatra-at-mumbai
विठ्ठल-रखुमाईच्या रथयात्रेतून कोरोनाबाबात जनजागृती...

By

Published : Jun 30, 2020, 1:06 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा विळखामुंबईत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबईत सध्या विठ्ठल-रुक्मिणीचा रथ फिरत आहे. यामध्ये विठ्ठल- रुक्मिणीला मास्क घातलेला आहे.

विठ्ठल-रखुमाईच्या रथयात्रेतून कोरोनाबाबात जनजागृती...

पूर्व उपनगरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेच्या एस वॉर्डकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाबाबत जनजागृती करणारी विठ्ठल-रुक्मिणीची रथयात्रा काढण्यात आली आहे.

पूर्व उपनगरात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगबाबत येथील नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे. यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी एस वॉर्डतर्फे विठ्ठल-रखुमाई यांची रथयात्रा काढून नागरिकांध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आणखी दोन दिवस पवई, कन्नमवार नगर या भागात हा रथ फिरवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भांडुप-विक्रोळी-पवई या भागांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आतापर्यंत पूर्व उपनगरात 4 हजारांच्यावर कोरोना रुग्णांचा आकडा गेला आहे. यामुळे विविध उपक्रमातून पालिका जनजागृती करत आहे.

सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सहाय्यक पालिका आयुक्त संतोष कुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा काढण्यात आली, असे पालिकेचे अधिकारी बाजीराव खैरनार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details