मुंबई - जगभरात, तसंच देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 वर पोहोचली आहे. मुंबई परिसरात कोरोनाचे 15 रुग्ण आहेत. दुबईहुन परतलेल्या 64 वर्षीय रुग्णाचा काल मृत्यू झाला. यामुळे राज्य सरकार अनेक उपाययोजना राबवताना दिसत आहे.
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवावी, अति महत्त्वाचे कामं असल्यास घरातून बाहेर निघावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तर, खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच देशातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 138 वर पोहचली आहे.