मुंबई - रिक्षाचालक संघटनेची परिवहन सचिव यांच्यासोबत मंत्रालयात पार पडलेली बैठक निष्फळ ठरली. यामुळे रिक्षाचालक संघटनेने संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमूख शहरांमधील सर्व रिक्षाचालक उद्या ९ जुलैुपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत.
परिवहन सचिवांसोबतची बैठक निष्फळ; रिक्षाचालक मंगळवारपासून बेमुदत संपावर - रिक्षा चालक
मंत्रायलयात परिवहन सचिव यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र, त्यावर कुठलाही तोडगा काढलेला नाही. यामुळे संपाच्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचे रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. मात्र, या संपाला भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेने विरोध दर्शविला आहे.
भाडेवाढ मिळावी, रिक्षाचालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याअंतर्गत असावे, ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा बंद करावी आदी मागण्यांसाठी परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार बैठका झाल्या आहेत. मात्र, सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. आज देखील मंत्रायलयात परिवहन सचिव यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यावर कुठलाही तोडगा काढलेला नाही. यामुळे संपाच्या निर्णयावर ठाण राहणार असल्याचे रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. मात्र, या संपाला भाजप प्रणित प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेने विरोध दर्शविला आहे.