मुंबई- केजीएन असोसिएशन या कंपनीने दहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचे लोकांना आमिष दिले होते. यात महाराष्ट्रातील २००० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती. मात्र कंपनीने या गुंतवणूकदारांना करोडोंचा चुना लावला. या प्रकरणी केजीएन असोसिएटमधील ४ जणांवर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरुण शेख, मुकेश मोरे, निलोफर शेख, फलिया शेख अशी गुन्हा नोंद झालेल्या चौघांची नावे आहेत.
मुंबईत गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावणारा रिक्षाचालक गजाआड - सादिक मलिक केजीएन असोसिएशन
या प्रकरणी केजीएन असोसिएटमधील ४ जणांवर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरुण शेख, मुकेश मोरे, निलोफर शेख, फलिया शेख अशी गुन्हा नोंद झालेल्या चौघांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी हरुण शेख याला सोमवारी अटक करून मुलुंड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हरुण शेख याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेला आरोपी हारून शेख हा रिक्षा चालवत असताना भीसीद्वारे गुंतवणूक करायचा. यादरम्यान त्याने पाच वर्षांपूर्वी केजीएन असोसिएशन ही कंपनी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात सुरू केली. दहा महिन्यात पैसे डबल करण्याच्या आमिशापोटी अनेकांनी या कंपनीत लोखोंची गुंतवणूक केली.
सुरुवातीच्या दोन वर्षात अनेक गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे डबल करून मिळाले. मात्र काही काळानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यास कंपनीकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतरअखेर या कंपनीच्या सर्व व्यवस्थापकांनी गुंतवणूकदारांना तोंडच दाखविने बंद केले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भांडुप पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.