मुंबई- कांजुरमार्ग पूर्वतील महर्षी कर्वे नगरमधील एकता इमारतीसमोर बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने झाड कोसळून रिक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
कांजूरमार्ग पूर्वेमध्ये झाड कोसळून रिक्षाचे नुकसान; धोकादायक झाडाखाली उभे न राहण्याचे पालिकेचे आवाहन
कांजूरमार्ग पूर्वेतील हे झाड धोकादायक आहे. गेल्या १० नोव्हेंबरला स्थानिक रहिवाशांनी संबंधीत झाडाची छाटणी करण्यासाठी पालिकेचा एस विभाग आणि स्थानिक आमदार सुनील राऊत यांना निवेदन दिले होते. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले
कांजूरमार्ग पूर्वेतील हे झाड धोकादायक आहे. गेल्या १० नोव्हेंबरला स्थानिक रहिवाशांनी संबंधीत झाडाची छाटणी करण्यासाठी पालिकेचा एस विभाग आणि स्थानिक आमदार सुनील राऊत यांना निवेदन दिले होते. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यातच बुधवारी दिवसभर वायू वादळाने मुंबई शहर आणि उपनगरात वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे हे झाड कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या रिक्षाचे नुकसान झाले आहे. त्यासाठी महापालिका जबाबदार असल्याचा आरोपी रिक्षा मालक दस्तगीर शेख यांनी केला आहे.
मुंबईत झाड कोसळण्याची घटना नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी चेंबूरला झाड कोसळण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यामध्ये एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत स्वस्तिक पार्कमध्ये मार्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ महिलेवर झाड कोसळल्याने त्यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे धोकादायक स्थितीत उभी असलेली झाडे मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी मुंबईत पालिकेने झाडावर पोस्टर्स लावून मुंबईकरांना सूचना दिल्या आहेत. वादळी-वाऱ्यासह पाऊस आल्यास झाडाची फांदी तुटेल किंवा झाड कोसळले. त्यामुळे सावधान राहा. झाडाखाली उभे राहू नका, अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी लावल्याचे दिसून येत आहे.