मुंबई - प्रत्येक महिलेने आत्मविश्वासाने आणि निर्धास्तपणे वाहन चालवावे, आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे, या संकल्पनेला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईस्थित 'ऑटो आय केअर' मोबाईल ॲपने पुढाकार घेतला आहे. ८ मार्च २०२१ रोजी असणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'चे औचित्य साधत या यंत्रणेने महिलांसाठी #borntodrive ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते ३१ मार्च दरम्यान महिला वाहनचालकांना फ्री रोड साईड असिस्टन्स देण्यात येईल. ८० टक्के महिलांच्या टीमसोबत या ॲपची हायटेक यंत्रणा यशस्वीपणे चालत आहे. या टीममध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणींचा समावेश असून ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या महिलांच्या स्वप्नांना पाठबळ मिळत असल्याचा आनंद ॲपचे संस्थापक सागर जोशी यांनी व्यक्त केला.
24×7 सुविधा उपलब्ध -
'ऑटो आय केअर' ॲपच्या माध्यमातून वाहनचालकांना एका क्लिकवर मेकॅनिक मिळवण्यापासून ते ड्रायव्हर हायर करण्यापर्यंत अनेक सुविधा 24×7 उपलब्ध होतात. शहरातील रस्ते, महामार्गांवरील वाहनचालकांकडून मागितली जाणारी मदत, शंकाचे निरसन हाताळण्यासाठी महिलांची विशेष कॉल सेंटरची टीम कार्यरत आहे. वाहनचालकांच्या तात्काळ मदतीसाठी जवळील गॅरेज किंवा मेकॅनिकची सेवा पुरविली जावी यासाठी, ही टीम तत्परतेने काम करत असते. देशभरातून दिवसाला वाहनचालकांचे हजारहून अधिक कॉल्स येतात. प्रत्येक कॉल यशस्वीपणे हाताळण्याचे कसब या टीममध्ये पहायला मिळते. 'महिला वाहन चालवू शकत नाही' ही विचारसरणी बदलणे काळाची गरज आहे. याच विचारसरणीला बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून प्रत्येक महिलेने आत्मविश्वासाने वाहन चालवावे यासाठी आम्ही #borntodrive मोहीम राबवत आहोत, असे सागर जोशी यांनी सांगितले. १ महिन्याच्या फ्री रोड साईड असिस्टन्समध्ये महिला वाहन चालकांना बॅटरी जम्पस्टार्ट, टायर पंक्चर, टोईंग, की लॉक आदी तांत्रिक समस्यांचे निवारण करण्यात येईल.
२० मिनिटांत समस्यांचे निवारण -