महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Bench On Children Custody: 'या' कारणाने आईपेक्षा वडिलांकडेच मुलांना ठेवण्याचा न्यायालयाचा निर्णय - मुलांचा ताबा वडिलांकडे देण्याचा निर्णय

मुस्लीम पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर पतीने मुलांना आपल्यासोबत नेले. मात्र, मुलांचा ताबा मिळावा यासाठी पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल देत मुलगी (वय 11 वर्षे) आणि मुलगा (वय 8 वर्षे) दोन्ही मुलांना शिक्षणाची सुविधा पुण्यात असल्यामुळे वडिलांकडे राहू द्यावे असा निकाल दिला.

Aurangabad Bench On Children Custodyc
न्यायालय

By

Published : Mar 26, 2023, 8:09 PM IST

Updated : Mar 26, 2023, 8:32 PM IST

मुंबई:मुस्लिम समुहातील पती-पत्नीचे लग्नानंतर काही दिवसांनी भांडण झाले. एकसारखे दोघांमध्ये वाद विवाद होत होते. एकमेकांचा स्वभाव किंवा इतर कारणाने त्यांच्यामुळे पटत नव्हते. आणि त्यांच्यात पराकोटीचा वाद झाला आणि पतीने मुलांना आपल्याकडे नेले. सबब पत्नीने न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र पती युसुफ आणि पत्नी रेश्मा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यानंतर पतीने पत्नीसह मुलांना घराबाहेर काढले. यानंतर मुलांचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून, तिने न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये नुकतीच महत्त्वाची सुनावणी पार पडली.


पत्नीचा दावा: पती युसुफच्या आई-वडिलांनी पत्नी रेश्माकडे असलेल्या मुलांना चॉकलेटच्या बहाण्याने फूस लावून नेले, असा आरोप करत तिने रेशमासह तिच्या आई-वडिलांनी केला. याबाबत त्यांच्याकडून तक्रारही दाखल करण्यात आली. मुलांचा ताबा आईकडे असला पाहिजे असे देखील त्या तक्रारीमध्ये म्हटले होते. पत्नीने या घटनेनंतर मी मुलांची आई आहे. आमच्या नवरा बायकोचे भांडण झालेले आहे. परंतु, मुले माझ्याकडे असली पाहिजे आणि मुले आईकडेच राहावीत. कायदा पण असेच सांगतो. त्यामुळे माझी मुले माझ्याकडे राहावीत असा तिने न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता.



पतीचा युक्तिवाद: पतीने देखील पत्नीच्या या दाव्यानंतर आपली बाजू मांडली की, मी पुणे शहरामध्ये राहतो आणि इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये मुलांना शिकायला मी टाकलेले आहे. मी आर्थिकदृष्या भक्कम आहे. माझा ट्रकचा व्यवसाय आहे आणि मी मुलांचे पूर्ण संगोपन करू शकतो आणि शिक्षणाचा खर्च करू शकतो. त्यामुळे त्या अर्थाने जर भविष्यातील त्यांची वाटचाल चांगली झाली पाहिजे. म्हणून इंग्रजी माध्यमात त्यांना शिकायला टाकलेले आहे. त्यामुळे मुले माझ्याकडे राहावीत त्यांचा ताबा माझ्याकडे राहावा, असे त्याने त्याच्या बाजूने सांगितले.



काय म्हणाले न्यायमूर्ती? दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्णपणे ऐकून न्यायालयाने म्हटले की, मुले पाच वर्षांपेक्षा मोठी आहेत आणि मुलांचे भवितव्यासाठी बाप काळजी करत आहे. आईचे म्हणणे बरोबर आहे की, मुले स्वतःकडे असली पाहिजे आणि कायदा देखील त्यांना त्यांच्या बाजूने आहे. परंतु, या ठिकाणी मुलांचे भवितव्य पाहता मुलगा-मुलगी पाच वर्षांच्यापेक्षा मोठी असल्यामुळे ते वडिलांकडे राहू शकतात. त्याचे वैध कारण असे आहे की, वडील तिथे चांगल्या वातावरणातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना शिकवत आहे. अलूर गावी जिथे पत्नी राहते तिथे कोणताही शिक्षणाच्या मूलभूत सोयी सुविधा अधिक नाहीत जितक्या की पुण्यामध्ये आहेत. याचा विचार मुलांच्या आईने करणे आवश्यक आहे.


खंडपीठाचा निकाल: आई-वडिलांची आर्थिक स्थिती देखील खराब आहे. त्यामुळे ते मुलांना अधिक चांगल्या सोयी सुविधा असलेल्या शाळेमध्ये घालू शकत नाहीत. लहानशा छोट्याशा गावामध्ये सोयी, सुविधा शिक्षणाच्या बाबतीत वानवा आहे. त्यामुळे सबब या मुलांना बापाने चांगल्या हेतूने शिकवण्यासाठी ताबा स्वतःकडे ठेवला आहे. तर तो ताबा बापाकडेच राहू द्यावा, असा महत्त्वाचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे.


न्यायालयाचा आदेश:मुलांची आईपासून ताटातूट होऊ शकत नाही. ही आईची बाजू देखील न्यायालयासमोर मांडली गेली. न्यायालयाने तिची बाजू देखील मान्य करत तिला महिन्यातून एकदा मुलांना भेटता येईल आणि ती भेट बालसुरक्षा अधिकाऱ्यांच्या समोर केली जाईल. तिला भेटायला तिच्या सासरचे लोक कोणीही किंवा पती रोखणार नाही; याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आगळावेगळा असा निकाल देत, मुलांना आई ऐवजी वडिलांकडे राहू द्यावे, असे म्हटलेले आहे. त्याचे वैध कारण म्हणजे, पाच वर्षांपेक्षा दोन्ही मुले मोठी आहेत. मुलांचे शिक्षणाचे भवितव्य पुण्यासारख्या शहरात राहून घडू शकेल, हे देखील न्यायालयाने अधोरेखित केले.

हेही वाचा:Koyta Attack On Student : धक्कादायक! दहावीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

Last Updated : Mar 26, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details