महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 23, 2021, 3:27 AM IST

ETV Bharat / state

सहकारी संस्थांच्या ऑडिटला 31 मार्च, 2022 पर्यंत मुदतवाढ - सहकारमंत्री

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास 31 मार्च, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

d
d

मुंबई- राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास 31 मार्च, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निर्णय बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच बंद होत असलेल्या साखर कारखान्यांची माहिती तरुणवर्गाला उपलब्ध करून देण्यासाठी मॉडेल कारखाना उभारणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास 31 मार्च, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मुदतवाढ दिल्यामुळे, संस्थेमधील काही महत्त्वाच्या विषयांना मंजूरी देण्याबाबत विलंब लागू शकतो. त्यासाठी, संस्थेमधील शिल्लक रकमेच्या विनियोगाचे अधिकार, पुढील वर्षाच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देणे व लेखा परिक्षकाची नेमणूक करणे, असे महत्त्वाच्या विषयांबाबत 2021-22 साठी वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर करण्याऐवजी मंजुरीचे अधिकार संचालक मंडळास देण्यात आले आहेत. शासन तरतुदीनुसार लेखापरिक्षण अहवाल सादर करण्यास आर्थिक वर्ष समाप्तीनंतर नऊ महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

मॉडेलच्या धर्तीवर साखर कारखाना

राज्यातील साखर संकुलात संग्रहालय उभारण्याचा निर्णय सहकार विभागामार्फत घेण्यात आला आहे. सुमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. मॉडेलच्या धर्तीवर हा कारखाना उभारला जाईल. नव्या पिढीला, तरुण वर्गाला माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे. पुढील तीन वर्षात मॉडेल कारखाना उभारला जाईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच कापूस खरेदीसाठी शासनाकडून 600 कोटीचा निधी देणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा -State Corona Update : रुग्णसंख्येत किंचित वाढ; राज्यात ३ हजार ६०८ नवे रुग्ण, ४८ मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details