मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक म्हणून ओळखला जाणारा इकबाल मिर्चीच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव मंगळवारी होऊ शकला नाही. याचे कारण म्हणजे अर्थ मंत्रालयाकडून आयोजित लिलावामध्ये बोली लावणाऱ्या व्यक्तींना लिलावाच रक्कम मोठी वाटत होती. राखीव ठेवलेली 3 कोटी 54 लाख रुपयांची बोली ही बाजार भावापेक्षा अधिक वाटत होती. त्यामुळे पुन्हा लवकरच लिलावाची नवीन तारीख ठरवून पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ जानेवारीला