मोदींच्या सभेने ठाकरेंना भरणार धडकी - अतुल सावे मुंबई : पंतप्रधान मोदींच्या सभेला आज हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असणार आहे. या सभेकडे सताधाऱ्यासोबत विरोधी पक्षाचे सुद्धा लक्ष लागले आहे. या सभेला आतापासूनच खासदार, आमदार उपस्थित झाले आहेत. मोदींच्या या सभेविषयी मंत्री अतुल सावे यांच्याशी खास बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. याप्रसंगी बोलताना मोदींची ही सभा उद्धव ठाकरे व त्यांच्या गटाला धसका भरवणारी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मोदी दोन्ही राज्यांमध्ये सुमारे 49,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करतील. मोदी कर्नाटकातील यादगिरी आणि कलबुर्गी या जिल्ह्यांमध्ये 10,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. पंतप्रधानांची या महिन्यातील ही दुसरी कर्नाटक भेट असेल. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी ते जानेवारी रोजी हुबळी येथे होते. तेथे त्यांनी भव्य रोड शो केला होता.
मुंबईत 38,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन : पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ते पायाभूत सुविधा विकसित करणे, शहरी प्रवास सुलभ करणे आणि आरोग्यसेवा बळकट करण्याच्या उद्देशाने 38,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तसेच ते सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चाची मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 मोदी राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान दुपारी 12 च्या सुमारास कर्नाटकच्या यादगीरमधील कोडकल येथे सिंचन, पिण्याचे पाणी आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.
मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी - यानंतर ते दुपारी 2.15 वाजता कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेड येथे पोहोचतील, जिथे ते नुकत्याच घोषित महसूल गावांतील पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्क (हक्कू पत्र) वितरित करतील आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणीही करतील. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कर्नाटकातील मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहे. भाजपने एकूण 224 पैकी किमान 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा आहे.
बहु ग्रामीण पेयजल पुरवठा योजनेची पायाभरणी : नरेंद्र मोदी सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या संकल्पनेनुसार जल जीवन मिशन अंतर्गत यादगीर बहु ग्रामीण पेयजल पुरवठा योजनेची पायाभरणी करतील. या योजनेंतर्गत 117 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुमारे 2,050 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प, यादगीर जिल्ह्यातील 700 हून अधिक ग्रामीण वस्त्या आणि तीन शहरांमधील सुमारे 2.3 लाख कुटुंबांना पिण्याचे पाणी पुरवेल. यावेळी पंतप्रधान नारायणपूर डाव्या किनारी कालवा विस्तार नूतनीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाचे (NLBC-ERM) उद्घाटन करतील. 10,000 क्युसेक वाहून नेण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प 4.5 लाख हेक्टर कमांड एरियाला सिंचन करू शकतो आणि कलबुर्गी, यादगीर आणि विजयपूर जिल्ह्यांतील 560 गावांतील तीन लाखांहून अधिक शेतकर्यांना फायदा होईल. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 4,700 कोटी रुपये आहे.
राष्ट्रीय महामार्ग 150C ची पायाभरणी : पंतप्रधान 65.5 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग 150C चे पायाभरणी करणार आहेत. हा सहा लेनचा ग्रीनफिल्ड रोड प्रकल्प सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेचा एक भाग आहे. ते बनवण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. कलबुर्गी, यादगीर, रायचूर, बिदर आणि विजयपुरा जिल्ह्यातील सुमारे 1,475 नोंदणी नसलेल्या वस्त्या नवीन महसूल गावे म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम तालुक्यातील मालखेड गावात या नव्याने घोषित महसूल गावांतील पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान मालकी हक्क पत्रे वितरित करतील. पंतप्रधान NH-150C च्या 71 किलोमीटर लांबीच्या विभागाची पायाभरणीही करतील. हा सहा लेनचा ग्रीनफिल्ड रोड प्रकल्प सुरत-चेन्नई एक्स्प्रेसवेचाही एक भाग आहे. हे 2,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले जात आहे. सुरत-चेन्नई द्रुतगती मार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधून जाणार आहे. त्यामुळे विद्यमान मार्ग 1,600 किमीवरून 1,270 किमीपर्यंत कमी होईल. कर्नाटक दौऱ्यानंतर मोदी मुंबईला रवाना होणार आहेत.
हेही वाचा -PM Modi Mumbai Visit : पंतप्रधानांच्या सभेपूर्वी बिकेसीमधील कमान कोसळली, जिवितहानी नाही