मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Atul Londhe Criticize To CM Yogi Adityanath ) मुंबईच्या दौऱ्यावर असून ते उद्योगपती आणि बॉलीवूड कलाकारांच्या भेटी घेत आहेत. उत्तर प्रदेशात उगोगांनी गुंतवणूक करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असला तरी धर्मांधता असलेल्या उत्तर प्रदेशात कोण गुंतवणूक करणार असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Leader Atul Londhe ) यांनी विचारला आहे. आधी गव्हर्नन्स सुधारा मग गुंतवणुकीची अपेक्षा करा, असा सल्लाही लोंढे यांनी दिला आहे.
आपण धर्मांधता पसरवतायोगी आदित्यनाथजी मुंबईतच काय पण संपूर्ण देशभर आणि जगात जरी फिरले तरी उद्योगपतींनी आपल्या येथे उद्योग ( Business Investment In UP ) का आणावेत हा प्रश्न कायम राहणार आहे. आपण धर्मांधता पसरवता, धार्मिक दुही माजवता, जाती-जातींमध्ये भेद करता, आपल्या येथे कायदा सुव्यवस्था एकदम वाईट परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या येथे उद्योगांनी काय यावे हा प्रश्न आहे. आमचीही इच्छा आहे, उत्तर प्रदेशातून अनेक बांधव महाराष्ट्रात नोकरीसाठी रोजगारासाठी येतात. त्यांना फार कष्ट करावे लागतात. त्यांना त्यांच्या राज्यात नोकरी, रोजगार ( Congress Leader Atul Londhe Criticized To CM ) मिळाला तर त्यांचे अनेक प्रश्न सुटतील. पण हे कसे होणार, कारण तुम्ही वातावरण इतके वाईट करून ठेवले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात उद्योग कसे येणार असा टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.