नवी मुंबई : सिडकोतर्फे नव्याने विकसित होत असलेल्या द्रोनागिरी नोड येथील सेक्टर 50 मधील M गोल्ड या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याचा प्रयत्न फसला (Armed robbery attempt foiled) आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता दुकान मालकाने दुकान उघडल्यावर मालक आणि एक साफसफाई करणारी महिला दुकानात गेली. दुकान उघडताच दोनच मिनिटात एक व्यक्ती हातात पिस्तूल घेऊन आता शिरला, तोंडावर मास्क आणि डोके कपड्याने बांधले होते. (bullion shop robbery Mumbai) (robbery thrill caught on CCTV)
Armed Robbery At Bullion Shop : सराफाच्या दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला; थरार सीसीटीव्हीत कैद - सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला
M गोल्ड या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याचा प्रयत्न फसला (Armed robbery attempt foiled) आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता दुकान मालकाने दुकान उघडल्यावर मालक आणि एक साफसफाई करणारी महिला दुकानात गेली. दुकान उघडताच दोनच मिनिटात एक व्यक्ती हातात पिस्तूल घेऊन आता शिरला, तोंडावर मास्क आणि डोके कपड्याने बांधले होते. (bullion shop robbery Mumbai) (robbery thrill caught on CCTV)
दुकान मालकावर फायर -दरोडेखोरापैकी एकाने काम करणाऱ्या महिलेच्या डोक्याला बंदूक लावली. तितक्यात मालक आल्यावर त्याने विरोध करताच मालकावर फायर केले. मात्र सुदैवाने गोळी झाडली गेली नाही. त्यानंतर लगेच मालकाने दुकानातले सायरन वाजवताच आरोपी फरार झाला. बाहेर पार्क केलेल्या गाडीत बसून तो पळून गेला. या गाडीत आणखी दोघेजण असल्याची माहिती दुकान मालकाने दिली आहे. त्यामुळे दरोडेखोरांच्या शसस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला असून सदर घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.