मुंबई :नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला आहे. या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असुम पुढील तपास सुरु आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव आहे. विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने विमानाला उपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असती. त्यामुळे विमानाचा उपघात होऊन प्रवाशांना जीव गमवावे लागले असते. या प्रवाशावर इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भदवी कलम 336 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न : इंडिगोचे विमान ( 6e 5274 ) 24 जानेवारीला सकाळी 11 च्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मुंबईसाठी निघाले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास विमान मुंबई विमानतळावर उतरत असतानाच कोणीतरी विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचे वैमानिकाला समजले. केबिन क्रूने तात्काळ तपासणी केली असता इमर्जन्सी गेटच्या हँडलचे कव्हर उघडल्याचे समोर आले आहे.
मोठा अनर्थ टळला :सुदैवाने विमान उतरत असताना ही घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर या प्रवाशाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इंडिगो विमान कंपनीने दिली आहे. याआधी इंडिगोच्या चेन्नई त्रीचिरपल्ली विमानात इमार्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला होता.