ठाणे :गुरुद्वारातून प्रसाद आणण्याच्या बाहण्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या जिन्यात घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. आवतार अंकल असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
विनयभंग करण्याचा प्रयत्न :मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही उल्हासनगर शहरातील 3 नंबर परिसरात कुटुंबासोबत राहते. ती नियमितपणे तिच्या घराजवळील गुरुद्वारामध्ये सकाळी 4.30 ते 6.00 वाजेपर्यंत प्रार्थना करण्यासाठी जात असे. आरोपी त्याच परिसरातील गुरुद्वारामध्ये पुस्तक वाचक म्हणून काम करत होता. आरोपीची बऱ्याच दिवसांपासून पीडित मुलीवर वाईट नजर होती. तो तिला एकटीला भेटून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे, आरोपी गुरुद्वाराच्या पाठीमागील इमारतीत राहत असल्याने 19 एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पीडित मुलीला गुरुद्वारातून करी चावलम आणण्यास सांगितले. त्यामुळे पीडित मुलगी परत गुरुद्वारात आली. तसेच मुलगी प्रसाद घेऊन आरोपीच्या घरी गेली, तेव्हा आरोपी तो राहत असलेल्या इमारतीच्या खाली उभा होता. ती प्रसाद घेऊन त्याच्याजवळ येताच त्याने पीडितेला आपल्या घरी नेले. घर, इमारतीच्या पायऱ्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.