महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपा खासदाराच्या आदेशावरून माजी सैनिकाला ठार मारण्याचा प्रयत्न - काँग्रेसचा आरोप - सचिन सावंत उन्मेश पाटील

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात भाजपा खासदाराच्या आदेशावरून सैन्यातील ज्येष्ठांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

sachin sawant
सचिन सावंत

By

Published : Sep 13, 2020, 5:06 PM IST

मुंबई - माजी निवृत्त अधिकाऱ्याला चुकीचे कार्टून काढले म्हणून मारहाण केल्यानंतर भाजपाकडून त्याचे जोरदार राजकारण सुरू आहे. यानंतर आज (रविवारी) काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही तीन वर्षांपूर्वी भाजपच्या एका नेत्यांकडून निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा विषय समोर आणून भाजपावर पलटवार केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात भाजपाचे खासदार उन्मेश पाटील यांच्या आदेशावरून लष्करातील माजी जवान सोनू महाजन यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर, जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर २०१६ साली हल्ला करण्यात आला त्याची दखलही फडणवीस सरकारने घेतली नाही. तीन वर्षे एफआयआरही दाखल केला नाही. मुंबईतील प्रकरणात निवृत्त अधिकाऱ्याच्या न्यायासाठी धडपडणारा भाजपा सोनू महाजनांना न्याय कधी मिळवून देणार, असा सवाल सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले, जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर २०१६ साली भाजपाचे आमदार उन्मेष पाटील, जे आता खासदार आहेत, त्यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. राज्यात त्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते, तेच गृहमंत्रीही होते तरीही, एफआयआरसुद्धा दाखल करुन घेतला नाही. उच्च न्यायालयाने २०१९मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा त्यांच्या आधीच्या संरक्षणमंत्र्यांनेही याची दखल घेतली नाही. सोनू महाजन यांच्यावरील हल्ल्याची दखल घेऊनराजनाथसिंहफोन करणार आहेत का? सैनिका-सैनिकांमध्ये संरक्षणमंत्र्यांनी भेदभाव का करावा? असे सवाल सावंत यांनी केले.
मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेली मारहाण असो, वा इतर कोणत्याही व्यक्तीला मारहाण करणे हे निंदनीयच आहे. मुंबईत झालेल्या या प्रकरणात तत्काळ एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जळगाव प्रकरणी तशी तत्परता का दाखवली गेली नाही, याचे उत्तर भाजपाने द्यावे. मात्र, भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांचे सैनिकांबद्दलचे वक्तव्य व जळगावचे महाजन मारहाण प्रकरण यावरून भाजपाचे देशप्रेम, सैनिकांबद्दलचा आदरदिसून आला आहे.

आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी सैनिक सोनू महाजन प्रकरणाचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असेही सावंत म्हणाले. सावंत यांनी या माजी जवानाच्या परिवाराने गुन्हा नोंदवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकेची प्रतही ट्विट केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details