मुंबई - भांडुपमध्ये कुख्यात गुंडांनी कहर माजवला असून , एका मटन व्यापारीवर काही जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. गुंडांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. व्यापाऱ्याने नकार दिल्याने त्याच्यावर गुंडांनी चाकूने वार करत त्याला जखमी केले.
भांडुपमध्ये गुंडांचा कहर ,पैसे देण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्यावर चाकू हल्ला - Mumbai crime news
मोहम्मद रफिक कुरेशी यांचे टिळक नगर दर्गा क्रॉस रोड ,सोनपूर भांडुप येथे मटनाचे दुकान आहे. ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून रात्री 1.30 वाजताच्या सुमारास घरी जात असताना काही गुंडांनी त्यांना रस्त्यात अडवून 5000 रुपयांची मागणी केली . दरम्यान, पैसे देण्यास कुरेशी यांनी नकार देताच 3 गुंडांनी त्यांच्या मानेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी तीन गुंडांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मोहम्मद रफिक कुरेशी (वय,35) असे जखमी झालेल्या व्यापाराचे नाव असून कुरेशी यांचे टिळक नगर दर्गा क्रॉस रोड , सोनपूर भांडुप येथे मटनाचे दुकान आहे. ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून रात्री 1.30 वाजताच्या सुमारास घरी जात असताना काही गुंडांनी त्यांना रस्त्यात अडवुन 5000 रुपयांची मागणी केली . दरम्यान, पैसे देण्यास कुरेशी यांनी नकार देताच 3 गुंडांनी त्यांच्या मानेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. सध्या कुरेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी 3 गुंडांविरोधात 507/2020 भांदवी कलम ,307,387,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी हे गुंड असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. हे आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे भांडुप पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्याम शिंदे यांनी संगितले.