महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राकेश मारिया यांच्यावर स्क्रिप्ट रायटिंगचा प्रभाव; मारियांच्या आरोपावर एटीएस प्रमुख देवेन भारती यांचे प्रत्युत्तर - rakesk maria book publish

निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी निवृत्तीनंतर लिहिलेल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकांमध्ये एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मारिया यांच्या आरोपाला भारती यांनी प्रसिध्दी पत्रक काढूनउत्तर दिले आहे.

mumbai
राकेश मारिया यांच्यावर स्क्रिप्ट रायटिंगचा प्रभाव; मारियांच्या आरोपावर एटीएस प्रमुख देवेन भारतींच प्रत्युत्तर

By

Published : Feb 18, 2020, 2:08 PM IST

मुंबई -निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी निवृत्तीनंतर लिहिलेल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकांमध्ये एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मारिया यांच्या आरोपाला भारती यांनी प्रसिध्दी पत्रक काढून उत्तर दिले आहे.

राकेश मारिया यांच्यावर स्क्रिप्ट रायटिंगचा प्रभाव; मारियांच्या आरोपावर एटीएस प्रमुख देवेन भारतींच प्रत्युत्तर

हेही वाचा -शीना बोरा प्रकरणात माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा देवेन भारतींवर खळबळजनक आरोप

भारती म्हणाले की, यामध्ये भारती यांनी मारिया यांचे कुटुंब हे बॉलिवूडशी संबंधित असून त्यांच्यावर स्क्रिप्ट रायटिंगचा फार मोठा प्रभाव आहे. हे सगळे प्रकरण म्हणजे केवळ पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी केलेला स्टंट असून येत्या काळात वेबसिरिज कंटेंट बनवण्यासाठी या गोष्टी गरजेचे असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. पोलीस दलातील एक व्यक्ती म्हणून चार्जशीट आणि रेकॉर्ड यावर माझा विश्वास असून या प्रकरणात तपास करणाऱ्या संपूर्ण टीमला सगळ्या गोष्टी माहित आहेत. यासंदर्भातील कागदपत्रे पडताळून पाहिल्यास सत्य समोर येईल ,असे भारती यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details