मुंबई : १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट होतील असा धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला काल आला होता. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) आरोपीला आज अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव नबी याहया खान उर्फ के. जी. एन. लाला. वय ५५ वर्षे असे (ATS Arrest Bomb Blasts Caller Arrest ) आहे.
बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी : काल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास कॉलकरून मुंबई शहरात बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देणाऱ्या इसमास दहशतवाद विरोधी पथकाने शोधून काढले आहे. 7 जानेवारीला सायंकाळी 7.29 वाजता एका इसमाने मुंबई पोलीसाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १०० नंबर हेल्पलाईनवर कॉल करून १९९३ ला जसा बॉम्बब्लास्ट झाला तसा बॉम्ब ब्लास्ट २ महिन्यानंतर मुंबईमध्ये माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी होणार ( Bomb blast 4 places Mumbai ) आहे. तसेच मुंबई मध्ये १९९३ सालासारख्या दंगली होणार ( riots Happend like 1993 ) आहेत. यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्बस्फोट आणि दंगली करण्यासाठी बोलविले आहे' असा संदेश मुंबई पोलीसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून दहशतवाद विरोधी पथकाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झाला होता.