मीरा भाईंदर: बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला महिला अंमलदारने धमकी व शिवीगाळ केली. याप्रकरणी महिला अंमलदारावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु महिला अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने अधिकारी महिलेला पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचं प्रश्न उपस्थित होत आहे. मिरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात तक्रारदार प्रेम सागर वाघ यांनी ही तक्रार केली आहे. वाघ यांच्या तक्रारीवरुन काश्मिरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला अंमलदारावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
संरक्षण मिळत आहे का? :एखाद्या सामान्य माणसावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला की, पोलीस कर्मचारी आरोपींना तत्पर अटक करत असतात. मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपी महिला पोलीस असल्याने पोलिसांकडून संरक्षण मिळत आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
काय आहे प्रकरण :याप्रकरणाविषयी अधिकची माहिती अशी की, संबंधित महिला आणि फिर्यादी २०२१ मध्ये नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळेस सदर महिला पोलीस अंमलदारानी २०२१ ला नवघर पोलीस ठाण्यात प्रेम सागर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जमीन त्यांनी घेतला होता.नवघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कारचा गुन्हा खोटा असून रद्द करण्यासाठी प्रेम सागर वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. २१ एप्रिल २०२२ रोजी नया नगर पोलीस ठाण्यात प्रेम सागर वाघ यांना महिला अधिकारीने धमकी आणि शिवीगाळ केली होती. यानंतर संबंधित महिलेविरोधात धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच संबंधित महिलेने प्रेम सागर आणि त्यांच्या कुटूंबाविरोधात वरिष्ठ अधिकारी वर्गाला खोटे ईमेल केले आणि वरिष्ठ अधिकारी यांना खोटी माहिती पुरवली. माझ्या कुटुंबाला मानसीक त्रास व भविष्यात धोका असल्याने नया नगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर पोलीस अंमलदार सोनवणे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. म्हणून ७ दिवसाची निलंबनाची कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. अर्जदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले अधिकारी: सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले तपास करत आहे. चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.अशी माहिती जयंत बजबळे,उपायुक्त परिमंडळ-१मीरा भाईंदर विभाग यांनी दिली आहे. दरम्यान संबंधित महिला आतापर्यंत ज्या-ज्या पोलीस ठाण्यात रुजू झाली त्या-त्या ठिकाणी काही न काही विवादित प्रकरणामध्ये चर्चेत राहिली अशी माहिती सूत्रांनी दिली. संबंधित महिलेविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील महिला अंमलदार काश्मिरा पोलीस ठाण्यात आजतागायत कार्यरत आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण मिळत आहे का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.