महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 'आत्मनिर्भर चहा' स्टॉलचं उद्‌घाटन - tea stall inaugurated in mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे ‘आत्मनिर्भर चहा’ च्या स्टॉलचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

आत्मनिर्भर भारत
आत्मनिर्भर भारत

By

Published : Jan 7, 2021, 6:37 AM IST

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे ‘आत्मनिर्भर चहा’ च्या स्टॉलचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, योगेश टिळेकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

मुंबईत आत्मनिर्भर चहाच्या स्टॉलचं उद्‌घाटन

भाजप नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद -


काल (बुधवार) मुंबई भाजप कार्यालयात भाजप नेत्यांची गेले दोन दिवस कार्यकर्त्यांशी संवाद आणि बैठक सत्र सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर 'आत्मनिर्भर टी स्टॉल' ह्या संकल्पनेचा शुभारंभ झाला. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्याचे सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभानसिंह पवैय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवस मुंबईत पक्षाची कोअर कमिटी, प्रदेश पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष इत्यादींच्या बैठका झाल्या. बैठकांमधील निर्णयांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details