महाराष्ट्र

maharashtra

लोकसभेसाठी २ जागा द्या; रामदास आठवलेंची युतीकडे मागणी

युतीच्या जागावाटपात आरपीयला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे रामदास आठवले नाराज असल्याचे सांगितले जात आहे. आधी त्यांनी एका जागेची मागणी केली होती. पण, आता ते दोन जागांची मागणी करत आहेत.

By

Published : Feb 25, 2019, 6:50 PM IST

Published : Feb 25, 2019, 6:50 PM IST

रामदास आठवले

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांची युती जाहीर झाली आहे. पण, या युतीत रामदास आठवलेंना एकही जागा न दिल्याने आठवलेंनी आपली नाराजी जाहीर केली आहे. लोकसभेसाठी आपल्याला २ जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेंनी युतीकडे केली आहे.

युती करताना रामदास आठवलेंना सांगण्यात आले नाही. त्यामुळे रिपाइं कार्यकर्ते आणि दलित समाजात नकारात्मक चर्चा होत असल्याचे आठवले म्हणाले. आम्हाला न विचारता युती झाली असली तरी मी नाराज नाही. युतीत जागा मिळाल्या नसल्या तरी आमचा पाठिंबा युतीला असेल, असे आठवलेंनी सांगितले. आठवलेंनी आरपीआयच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. यात युतीकडे दोन जागा मागाव्यात असा ठराव झाला आहे.

राज्यात आम्हाला लोकसभेच्या २ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका आम्ही २०१४ पासून मांडतो आहोत. रिपाइंला निवडणूक चिन्ह मिळवायचे असेल, तर २ खासदार निवडणून येणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला २ जागा पाहिजेत अशी भूमिका आठवलेंनी मांडली. आठवले म्हणाले, की आम्ही मोठा धोका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला. शिवशक्ती-भीमशक्ती युती केली. पण, या युतीत आम्हाला हरणारी साताऱ्याची जागा देण्यात आली.


आता आमच्या कार्यकारणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने दक्षिण अथवा ईशान्य मुंबईतील जागा सोडावी. भाजपने राज्यात लातूर, मटेक, सोलापूर यापैकी एक जागा आम्हाला सोडावी, असे आठवले म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details