महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चौपाटीसह शहरातील गस्तीसाठी अत्याधुनिक 'एटीव्ही' वाहने मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल - ATV news

मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात एटीव्ही (ऑल टेरेन व्हेईकल्स) वाहने दाखल झाले आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने ही वाहने देण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवत या वाहनांचे उद्घाटन केले.

वाहने
वाहने

By

Published : Jun 7, 2021, 7:45 PM IST

Updated : Jun 7, 2021, 10:28 PM IST

मुंबई- मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात एटीव्ही (ऑल टेरेन व्हेईकल्स) गाड्या दिसणार आहेत. वाळूमध्ये चालत गस्त घालणे जिकरीचे अल्याने अशा गाड्यांची मदत होणार आहे. या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्र्यांनी याचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते.

बोलताना गृहमंत्री

गिरगाव चौपाटी येथे झालेल्या या सोहळ्यास पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक संजीव पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या शिरीन कोतवाल आदी उपस्थित होते.

सुसज्ज व अत्याधुनिक एटीव्ही वाहनांविषयी

या वाहनाला सर्वपृष्ठीय वाहन असे म्हणू शकतो. एखादी अघटीत घटना घडल्यास तत्काळ मदतीला पोहचण्यासाठी या वाहनाचा वापर करता येतो. त्यासाठी ही वाहने मुंबई पोलीसांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे एक सर्व समावेशक वाहन आहे. ते जमीन, रेती, दलदलीचा भाग, वालुकामय अशा सर्व पृष्ठभागावर चालते. त्यामुळे चौपाटी परिसरात याचा वापर करता येऊ शकतो. वाहनाची 570 सीसी अशी उच्च क्षमता आहे. त्यामुळे ते वेगवानही आहे. बंदोबस्तावरील चार जण या वाहनातून गस्त घालू शकतात. आणीबाणीच्या प्रसंगी वाहनातील दोरखंड, तरंगते हूक्स (फ्लोटींग हुक्स) अशा सुविधांचाही वापर करता येऊ शकतो.

हेही वाचा -मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली

Last Updated : Jun 7, 2021, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details