महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 22, 2023, 4:32 PM IST

ETV Bharat / state

Narhari Zirwal Met Sharad Pawar : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली शरद पवारांची भेट

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला सध्या सुरवात झाली आहे. नरहरी झिरवाळसह त्यांच्या पत्नीने शरद पवार यांची सिल्वर या निवासस्थानी भेट घेतली आहे.

Narahari Jirwal Met Sharad Pawar
Narahari Jirwal Met Sharad Pawar

मुंबई :मुंबई राज्यात दररोज नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि गाठीभेटींमुळे राज्यातील राजकारण तापल्याच चित्र आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

सहपत्नीक घेतली भेट :विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर या निवासस्थानी भेट घेतली. नरहरी झिरवाळ आपला राष्ट्रकुल संसदीय मंडळ अर्थात सीपीए महाराष्ट्र शाखा आयोजित जपान येथील अभ्यास दौरा पूर्ण करून मायदेशी परतले. आज आज शरद पवार यांची जाऊन भेट घेतली. जपान येथील अभ्यास दौऱ्यावर देखील चर्चा झाल्याचे समजते. त्यासोबत राज्यात सुरू असलेल्या राजकारणात संदर्भात देखील च्या झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जपान येथील अभ्यास दौऱ्यावर गेले होते. अजित पवार भाजपा सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे वातावरण तापले होते. मात्र, याबाबत स्वतः अजित पवार यांनी खुलासा केला होता. परंतु जपानी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.


सिल्वर ओकवर भेटीचे सत्र :राज्यातील राजकारण वेगवेगळे प्रकारचे राजकारण राज्यात सुरू असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी अनेक नेते मंत्री, पवार यांच्या भेटीला जात असल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावणे सध्या सुरू आहे. संजय राऊत, उद्योगपती गौतम अदानी, उद्योग मंत्री उदय सामंत, आज उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट घेतली. सध्या राज्यातील राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे, या संदर्भात बोलणे कठीण झाले आहे. सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरवले तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही अपात्र होतील. असे झाले तर सरकार कोसळू शकते या भीतीपोटी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.



जपान अभ्यास दौरा :विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष विधान परिषद उपसभापती आणि शिष्टमंडळाने जपान दौऱ्यातील मूलभूत सुविधा देणारे, कचरा व्यवस्थापन करणाऱ्या प्रकल्पांनाही भेटी दिल्या. आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असल्याचा अनेक कायदेतज्ञ् सांगत आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्ष निर्णयाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या दालनात येऊ शकतो. नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती .नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांची सदिच्छा भेट जरी घेतली असली तरी त्या मागचे कारण समजू शकले नाही.

हेही वाचा - Modi Kerala Visit: केरळ दौऱ्यात पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजप कार्यालयात आले पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details