महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rahul Narvekar : बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम; ठाकरे कुटुंबाच्या उपस्थितीची माहिती नाही - अ‍ॅड. राहुल नार्वेकर - Balasaheb Thackeray

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह ठाकरे कुटुंबालाही या समारंभासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. मात्र, त्यांच्या उपस्थितीबद्दल अद्याप माहिती हाती आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Narvekar
राहुल नार्वेकर

By

Published : Jan 18, 2023, 8:33 PM IST

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर माहिती देताना

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी विधिमंडळातील मुख्य सभागृहात त्यांचे तैलचित्र लावण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात भव्य कार्यक्रम करण्यात येणार असून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला ठाकरे परिवारातील सर्व सदस्यांना निमंत्रित केले आहे, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

चार तैलचित्रांची निर्मीती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव आक्रमकता आणि विचारांना साजेशी तैलचित्र तयार व्हायला हवे, यासाठी चार विविध कलावंतांना तेल चित्र तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. या चार तैलचित्रांपैकी जे तैलचित्र मध्यवर्ती सभागृहात लावण्या योग्य असेल आणि ज्यामुळे बाळासाहेबांची नेमकी प्रतिमा लोकांपर्यंत जाईल, असे चित्र निवडून ते लावण्यात येणार आहे हे चित्र निवडण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाकरे परिवाराच्या उपस्थिती बाबत माहित नाही : ठाकरे परिवाराला या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे सन्माननीय आमदार असल्यामुळे त्यांना राजे शिष्टाचाराप्रमाणे निमंत्रणे आहेत. मात्र, ठाकरे परिवारातील अन्य सदस्यांनाही या कार्यक्रमांचे निमंत्रण देण्यात आले आहे. यापैकी कोण उपस्थित राहणार याबाबतची स्पष्टता अद्याप झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले असून ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

तैल चित्राबाबत राजकारण नको : बाळासाहेब ठाकरे यांची केवळ राज्यातच नव्हे तर देशातही मोठी कीर्ती आणि प्रतिमा होती. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल, असा कोणताही प्रयत्न होणार नाही. दरम्यान, यासंदर्भात जर कोणी राजकारण करत असेल तर त्यांनी तैलचित्राबाबत राजकारण करू नये. तसेच बाळासाहेबांच्या प्रतिमेला तडा जाईल अशा पद्धतीचा कोणतेही कार्य विधानभवनाकडून केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :CM Eknath Shinde : एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details