महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत सुट्टीचा दिवस साधत सर्व पक्षीय उमेदवारांनी उडवला प्रचाराचा बार - मुंबई विधानसभा उमेदवार

सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन जास्तीतजास्त लोकांतपर्यंत आपल्याला पोहचता यावे यासाठी उमेदवारांनी काल सकाळपासूनच कुठे पायी तर कुठे गाडीवर रॅली काढत गलोगल्ली फिरून प्रचार केला. मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. यात उभे असलेले सर्वच पक्षातील उमेदवार  जोरदार प्रचार करत आहेत.

मुंबईत सुट्टीचा दिवस साधत सर्व पक्षीय उमेदवारांनी उडवला प्रचाराचा बार

By

Published : Oct 7, 2019, 11:25 AM IST

मुंबई -उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. सुट्टीचा दिवस (रविवार) असल्याने उमेदवार प्रचार करण्यासाठी कालचा उपयोग करताना दिसले. सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन जास्तीतजास्त लोकांतपर्यंत आपल्याला पोहचता यावे, यासाठी उमेदवारांनी काल सकाळपासूनच कुठे पायी तर कुठे गाडीवर रॅली काढत गलोगल्ली फिरून प्रचार केला. मुंबईत 36 मतदार संघ आहेत. यात उभे असलेले सर्वच पक्षातील उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत.

हेही वाचा -आचारसंहिता : मुंबई उपनगरात ९.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि उमेदवार नवाब मलिक यांनी काल पदयात्रा काढली. तसेच भाजपचे आशिष शेलार यांनी देखील जनतेच्या दारात जात लोकांकडून निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतला. तसेच शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी काल सकाळी वरळीत काही ठिकाणी पदयात्रा काढून आपला प्रचार केला. तसेच सायंकाळी देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्यांची रॅली झाली. मनसेचे दादर येथील उमेदवार संदीप देशपांडे यांनी देखील घरोघरी जाऊन आपला प्रचार केला आहे. मुंबईत वंचित आघाडीने वगळता सर्वच राजकीय पक्षांपासून ते अपक्ष उमेदवारांनी काल आपला प्रचार केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details