मुंबई - गणेशोत्सवाच्या कळात साकारले जाणारे देखावे हा कुतहलाचा विषय असतो. सध्या सोशल मीडियाचा अतिवापर वाढला आहे. युवापिढी तासनतास त्यात गुंतून राहते. याबाबत जागृती करण्यासाठी विक्रोळी येथील अस्मिता महाविद्यालयाने 'सोशल मोडियाचा अतिवापर कराल तर, बाप्पा कान पिळेल' अशा आशयाचा आगळावेगळा देखावा साकारला आहे.
हेही वाचा - कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या महागणपतीची पहिली आरती
गणेशोत्सवाला दीड दिवसाच्या गणपतीचे महाविद्यालयात आगमन झाले होते. महाविद्यालयात दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यात येते. त्यानिमित्ताने यावर्षी, महाविद्यालयाने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांचा अतिरेक टाळा आणि समाजभान ओळखा, असा संदेश देणारा देखावा उभारला आहे.
हेही वाचा - पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस, गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण
सोशल मीडियाचा अतिरेक होत आहे. युवक स्वमग्न होत आहेत. युवकांचा पालकांशी आणि शिक्षकांशी संपर्क तुटला आहे. हा संपर्क पूर्ववत व्हावा, या उद्देशाने हा देखावा उभारण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रयोगशील रहावे आणि सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक कामासाठी करावा, असेही या निमित्ताने सांगण्यात आले.