महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Airport: कार्बन उत्सर्जन कमी करण्यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तिसऱ्या क्रमांकावर - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

जगामध्ये कार्बन उत्सर्जन कमी व्हावे आणि पर्यावरण पूरक वातावरण असले पाहिजे. यासाठी विविध देश प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जागतिक विमानतळाच्या दृष्टिकोनातून आता चारपेक्षा अधिक मान्यता त्यांनी प्राप्त केलेली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) संपूर्ण आशिया पॅसिफिक प्रदेशात या प्रकारचे दोनच विमानतळ आहेत. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची भर पडलेली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यात हे विमानतळ तिसरे विमानतळ ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

By

Published : Dec 22, 2022, 9:25 PM IST

मुंबई - देशात आणि जगात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या पर्यायाचा अवलंब केला जात आहे. आणि या पर्यायाचा अवलंब केल्यावर काही देशांमध्ये कार्बन क्रेडिटही दिले जाते. (reducing carbon emissions) अद्यापही भारत आणि इतर देशांमध्ये ते कार्बन क्रेडिट ही प्रणाली येणे बाकी आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांनी जागतिक कार्बन अक्रोडेशन यांच्या निश्चित केलेल्या चारपेक्षा अधिक श्रेणी प्राप्त केली आहे. त्यामुळे आशिया पॅसिफिक प्रदेशातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा देखील समावेश झालेला आहे, आता एकूण तीन विमानतळ एशिया पॅसिफिक प्रदेशांमध्ये आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

कशामुळे हे शक्य झाले -कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यवस्थापनाद्वारे नवीन-नवीन प्रणालींचा वापर केला. या विमानतळावर हरित विमानतळ होण्यासाठी विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड केली. आता विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हिरवा झालेला आहे आणि यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यामध्ये भर पडली. विमानतळाद्वारे ग्रीन हाऊस गॅस रिडक्शन यासाठी एक रोड मॅप तयार केला होता. ज्यामध्ये या विमानतळावर त्याचा परिणाम झाला. (2019)पर्यंत ऑपरेशन नेट झिरो कार्बन उत्सर्जनासाठी आता वाटचाल सुरू झालेली आहे. ऊर्जेचा वापर कमी करणे आणि नैसर्गिक ऊर्जेचा वापर अधिक करणे यासाठी गुंतवणूक केली गेली, कार्बन मॅनेजमेंट कमिटीची स्थापना झाली. क्रॉस फंक्शन क्लाइमेट चेंज यावर लक्ष दिले गेले, हरित आणि कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला आहे.

हिरवळ निर्माण होण्यास मदत - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी ईटीवी भारताला माहिती दिली आहे, की आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोपट्यांची संख्या 43 लाख 91 हजार 960 इतकी झालेली आहे. आणि आता त्याची मोठी झाडे होण्याकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे हिरवळ निर्माण होण्यास मदत झाली आहे. ऑन साईट युनियन पावर जनरेशन प्लांट 4.65 मेगावातपर्यंत वाढवला आहे, या विमानतळावरील रस्ते 100 टक्के टिकाऊ पद्धतीचे बनवले आहेत. अशा विविध पर्यायी पद्धतीचा वापर केल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details