मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेला पराभव लक्षात घेता त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नाही. आम्ही सर्वच त्यासाठी जबाबदार आहोत. त्यात महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे मी कोणावर दोष देत नाही, गरज पडल्यास मीही पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास तयार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते आज मुंबईमध्ये बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला 9-10 जागांवर फटका बसला. लोकसभा विधानसभा विषय वेगळा, हेच विधानसभेत असणार नाही. वंचित भाजपची बी टीम असल्याचे मी वारंवार बोलत होतो, त्याचा फायदा भाजपालाच झाला, हे आता समोर आले असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.