महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठी निराशाजनक - अशोक चव्हाण - मुंबई

पेट्रोल-डिझेल महागणार असल्याने सर्वसमान्यांना फटका बसणार आहे. तसेच गृह कर्ज योजनेचा फायदा ४५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांनाच होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना अशोक चव्हाण

By

Published : Jul 5, 2019, 8:22 PM IST

मुंबई - सरकारने केलेले आर्थिक दावे वस्तूस्थितीशी विसंगत आहेत. सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक ठरलेला आहे. गरीबांसाठी काहीही घोषणा करण्यात आलेल्या नाही, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना अशोक चव्हाण

सरकार विकास दर चांगला असल्याचा दावा करतात. मात्र, विकास दर वाढवण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याच सरकारने एलईडी बल्ब वाटण्याची योजना सुरू केलेली आहे. तसेच उज्जवला गॅस योजनाही सुरू केली आहे. मात्र, या दोन्ही योजना फसव्या आहेत. सरकारला विकास दर गाठता येत नाही. दिलेले आश्वासन पूर्ण करता येत नाही. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवायचे? याबाबत या अर्थसंकल्पात तरतुद केलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे चव्हाण म्हणाले.

पेट्रोल-डिझेल महागणार असल्याने सर्वसमान्यांना फटका बसणार आहे. तसेच गृह कर्ज योजनेचा फायदा ४५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांनाच होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details