महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तावडेंबाबत नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा तावडेंना टोला - undefined

सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंना यावेळी भाजपने तिकीट नाकारले आहे. यावरुनच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

अशोक चव्हाणांचा तावडेंना टोला

By

Published : Oct 5, 2019, 3:44 PM IST

मुंबई - सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंना यावेळी भाजपने तिकीट नाकारले आहे. यावरुनच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्‍या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - लातूर शहर मतदारसंघात भाजपची लढत काँग्रेसपेक्षा वंचितसोबत अधिक - शैलेश लाहोटी

हेही वाचा - केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक; सर्वधर्मीयांचा सन्मान गरजेचा - शरद पवार

एक मित्र म्हणून मला विनोद तावडेंबद्दल सहानुभूती असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये, असा सल्ला विनोद तावडेंनी अशोक चव्हाण यांना सल्ला दिला होता. लोकसभेला तुमचा पराभव झाला होता.आता विधानसभेलाही झाकली मूठ ठेवा असे वक्तव्य तावडेंनी चव्हाण यांच्याबद्दल केले होते. तावडेंना उमेदवारी न मिळल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तावडेंसारखी वेळ कोणावरही येऊ नये असे आव्हाड म्हणाले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details