मुंबई - खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मला राऊत यांच्या विधानावर बोलण्याची काही गरज वाटत नाही. राऊत यांचे विधान हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
'कोणाची व्यक्तिगत विधाने सरकारची असू शकत नाहीत' - संजय राऊत बातमी
सावरकर यांच्या संदर्भात काँग्रेसची भुमिका अजूनही कायम आहे. परंतु, शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार हे एका सर्वसमावेशक कार्यक्रमानुसार चाललेले आहे. त्या आधारावर काम करत आहे.
ashok-chavan-comment-on-sanjay-raut-in-mumbai
हेही वाचा-...तर मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणिसंग्रहालयात हवी
सावरकर यांच्या संदर्भात काँग्रेसची भुमिका अजूनही कायम आहे. परंतु, शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार हे एका सर्वसमावेशक कार्यक्रमानुसार चाललेले आहे. त्या आधारावर काम करत आहे. त्यामुळे कोणाचे व्यक्तिगत मत हे सरकारचे मत असू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.