मुंबई - प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून अनेक निरापराधांचे जीव गेले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करुन, नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी असेही चव्हाण म्हणाले.
प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निरापराधांचे जीव गेले - अशोक चव्हाण - ratnagiri tiware dam
प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून अनेक निरापराधांचे जीव गेले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करुन, नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी असेही चव्हाण म्हणाले.
रत्नागिरीतील तिवरे धरण फुटून २५ जण बेपत्ता झाले होते. यामधील १४ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. धरणाला तडे गेल्याच्या अनेक तक्रारी असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निरपराधांचे जीव गेल्याचे चव्हाण म्हणाले.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला होता. त्यानंतर ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, २ वर्षांपासून धरणाची गळती सुरू होती. वारंवार तक्रार करूनही ती दुरस्त केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हे धरण २० वर्षापूर्वी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने बांधले होते.