महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashish Shelar : ठाकरे विकासाच्या वाटेतील गतिरोधक, तुमची ग्रामपंचायतीत तरी सत्ता टिकेल का, आशिष शेलार यांचा टोला - तुमची ग्रामपंचायतीत तरी सत्ता टिकेल का

शिवसेनेची मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील अनेक (Ashish Shelar On Uddhav Thackeray) ग्रामपंचायतीमध्ये असलेली सत्ता जाण्याची वेळ आलीय. (Ashish Shelar taunts Uddhav Thackeray) त्यांना महाराष्ट्रात आणि देशात त्यांची सत्ता येणार अशी उद्धव ठाकरेंना स्वप्नं पडू लागली आहेत. त्यांचे खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच सगळे पक्ष सोडून गेले. मग तुमची ग्रामपंचायतीत जी सत्ता होती ती तरी टिकेल का? असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Ashish Shelar
अ‍ॅड आशिष शेलार

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 4:10 PM IST

आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई: अ‍ॅड. आशिष शेलार हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की, मुंबईत आलेले उद्योग ते पळवून लावायचे. (Mumbai BJP President) मुंबईत बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला. (MLA Adv Ashish Shelar) हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत. (Uddhav Thackeray) कालच्या भाषणात जाहीरपणे त्यांनी ही बाब बोलून दाखवली, असा टोला आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी लगावला. (Ashish Shelar)


उद्धव ठाकरेंच्या 1 हजार पेक्षा जास्त घोषणा:"मी करणार म्हणजे करणारच....!" आरक्षण देणार म्हणजे देणारच...! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच...! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच...! उद्धव ठाकरेंनी गेल्या 10 वर्षांत अशा 1 हजार 531 घोषणा केल्या. आमच्या बॅक ऑफिसने कालच यांची मागची दहा वर्षांतील भाषणे काढली. त्यामध्ये आश्चर्यकारक ही माहिती समोर आली. त्या घोषणांचं पुढे काय झालं? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही. उध्दव ठाकरे म्हणजे "पोकळ शब्दांचे खोडकळ नेते" आहेत, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पलटवार केला. पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. उद्धव ठाकरे हे सख्ख्या भावा विरोधात न्यायालयात लढले की नाही? त्यांचे त्यांच्या वहिनी सोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? असे आशिष शेलार म्हणाले.

ठाकरेंनी चुलत भावाला पक्षाबाहेर काढले:शेलार उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले की, वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्ख्या भावाने आरोप केले. चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला, असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, एकेरीत अजिबातच बोलू नका. यापुढे पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केलात तर आमचे नेते पण तुमचा अपमान करतील, तो सहन करण्याची तयारी ठेवा, असा इशारा आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी दिला. आम्ही "मेरी माटी मेरा देशवाले" आहोत. तुमच्या सारखे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" वाले नाही, असा टोलाही ठाकरेंना लगावला आहे.

हेही वाचा:

  1. Sanjay Raut News: भाजपाच्या सहवासात आल्यापासून मुख्यमंत्री खोट्या शपथा घेऊ लागले-संजय राऊत
  2. Nilesh Rane Retirement : निलेश राणेंच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर 'सागर' बंगल्यावर खलबतं; मंत्री रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा
  3. Shiv Sena Dasara Melava : ...मग महाराष्ट्रातील भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता..संजय राऊत यांची महायुतीवरून भाजपावर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details