महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashish Shelar : उद्धव ठाकरेंना जातीधर्माच्या आधारे मत मागण्याची वेळ का ? आशिष शेलार यांचा सवाल - Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party ) जाती धर्माच्या आधारावर मत मागण्याची वेळ का आली आहे? शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मराठी मुस्लिम यांचे समर्थन अशी बातमी छापून मतांची पेरणी सुरू आहे का ? असा सवाल भाजपाचे मुंबई अध्यक्ष एडवोकेट आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ( Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray ) केला.

आशिष शेलार
आशिष शेलार

By

Published : Oct 29, 2022, 6:58 PM IST

मुंबई :शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून 22 ऑक्टोबरला मराठी मुस्लिमांचे शिवसेनेला समर्थन अशी बातमी छापून आणण्यात ( Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray ) आली. यामुळे आता उद्धव ठाकरे हे मुस्लिम समाजाचे लांगुलचालन करू लागले आहेत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मतांची नवी पेरणी सुरू असल्याचा आरोप भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष एडवोकेट आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलार



पराभव समोर दिसतात समर्थन :मुंबई महानगरपालिकेत पराभव समोर दिसू लागल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party ) सर्वांकडून समर्थन मागु लागले आहे त्यासाठी आता मराठी मुस्लिम असा शब्द वापरून मराठी आणि मुस्लिम दोन्ही समाजाकडून मतांसाठी समर्थन मागण्याचा हा प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे पोटनिवडणुकीत लालबावट्याकडूनही समर्थन मागण्यात आले. आता तर जाती धर्मावर मत मागण्याची वेळ उद्धवजींवर आली आहे पराभव समोर दिसत असल्यामुळे हे सर्व सुरू आहे. असा दावाही शेलार यांनी यावेळी केला. मालवणी आणि मोहम्मद अली रोड या ठिकाणी असलेल्या बेदरकार लोकांवर अजूनही कारवाई होत नाही मुंबईत असे मालवणी आणि मोहम्मद अली रोडचे पॅटर्न अजून किती तयार करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला तर अजमल कसाबला मराठी कपडे घालणार का असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

भाजपची जागर मुंबईचा यात्रा :मुंबईतील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या समस्या थेट मांडण्यासाठी आता भाजपाच्या वतीने सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि सर्व प्रभाग आणि वार्डांमध्ये जागर मुंबईचा ही यात्रा नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार ( BJP Jagar Mumbaicha yatra ) आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मुंबईत सुरू होणार असून मराठी मुंबईकरांच्या प्रश्नांना आम्ही थेट हात घालणार आहोत. अशी माहिती यावेळी शेलार यांनी दिली.

घरबशा मुख्यमंत्री आणि घरगड्या उद्योग मंत्री : राज्यातील प्रकल्प गुजरातला चालल्याबद्दल शेलार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की याला गेल्या सरकारमधील गर्भाशया मुख्यमंत्री आणि घरगड्या उद्योग मंत्री कारणीभूत आहे. या लोकांनी जर वेळीच लक्ष दिले असते तर हे प्रकल्प राज्याबाहेर गेले नसते. त्या संदर्भातील सर्व तारखा आता बाहेर येतात उलट सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शेवटच्या क्षणी प्रयत्न केला. उद्योग राज्यातच सुरू होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांचा मी स्वागत करतो असेही शेलार यावेळी म्हणाले.


किशोरीताई प्रामाणिकपणे घर परत करा :सर्वसामान्य गरीब झोपडपट्टी धारकांची घरे जर किशोरीताई यांनी लाटली असतील तर त्यांच्यासारख्या व्यक्तीने स्वतःहून सांगायला हवं की ही घरे परत घ्या पण या संदर्भात कोणी प्रश्न विचारला तर त्याला उलट उत्तर देण्यापेक्षा गरिबांच्या हिताचा निर्णय घ्या असा सल्लाही शेलार यांनी दिला (Ashish Shelar criticize Kishori Pednekar ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details