मुंबई Ashish Shelar on Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर भाजपावर बोचरी टीका केली होती. "हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून, भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होता", असं ते म्हणाले. त्यांच्या या टीकेला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. "राऊत यांनी पंतप्रधानांवर बोलताना सांभाळून बोलावं, नाहीतर जीभ हासडावी लागेल", असं शेलार म्हणाले.
बावनकुळे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर : संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कॅसिनोत खेळल्याप्रकरणी टीका केल्यानंतर त्या टीकेला भाजपाकडून सडेतोड उत्तर दिलं जात आहे. भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, "एलॉन मस्क यांना विनंती करणार आहे की, राजकीय पक्षातील नेते, विशेषतः प्रभादेवीच्या गल्लीत बसून स्वतःला संपादक म्हणवून घेणारे ट्विट करणार असतील तर त्यांच्या ट्विटला 'नो अल्कोहोल कन्झ्युम', 'नो गांजा कन्झ्युम', असं प्रमाणपत्र जोडावं आणि मगच त्यांनी ट्विट करावं".