महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashish Shelar : शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला, आशिष शेलार यांची शिवसेना आणि काँग्रेसवर टीका - Ashish Shelar criticizes Shiv Sena and Congress

राज्यात दसरा मेळाव्यावरून ( Dussehra Melawa ) राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या यात्रेवरून सुद्धा भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली ( BJP criticizes Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) आहे. भाजप नेते व मुंबई भाजपचे अध्यक्ष, आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी काँग्रेसचीभारत जोडो यात्रा व शिवसेनेचा दसरा मेळावा यामध्ये दोघांची एकमेकांना साथ असून या दोन्ही ठिकाणी गर्दी जमवण्यासाठी छुपा समझोता झाल्याचा आरोप एका प्रसिध्दी पत्रकारद्वारे केला आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार

By

Published : Oct 2, 2022, 5:55 PM IST

मुंबई -राज्यात दसरा मेळाव्यावरून ( Dussehra Melawa ) राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या यात्रेवरून सुद्धा भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली ( BJP criticizes Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) आहे. भाजप नेते व मुंबई भाजपचे अध्यक्ष, आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी काँग्रेसचीभारत जोडो यात्रा व शिवसेनेचा दसरा मेळावा यामध्ये दोघांची एकमेकांना साथ असून या दोन्ही ठिकाणी गर्दी जमवण्यासाठी छुपा समझोता झाल्याचा आरोप एका प्रसिध्दी पत्रकारद्वारे केला आहे.

काय म्हणालेत आशिष शेलार ? -यानिमित्ताने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आशिष शेलार म्हणतात की, काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात ! सगळा गोंधळ घालून घड्याळ बघा कसे नामानिराळे संसार तिघांचा, प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले.
काय तो भारत जोडो... काय तो पेग्विन सेनेचा दसरा.. शिववड्याच्या चटणीला बिर्याणीचा मसाला हातच्या कंकणाला आरसा कशाला? सगळं कसं ok मध्ये आहे. एकीकडे काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनाला पेंग्विन सेना अर्थात शिवसेनेने साथ द्यायची ( BJP criticizes Shiv Sena on Dussehra Melawa ) तर दुसरीकडे शिवसेनेच्या दुसऱ्या महिलांसाठी काँग्रेस साथ देणार असा छुपा समझोता झाल्याचा आशिष शेलार यांनी सांगितल आहे. तसेच काँग्रेस व शिवसेनेमध्ये हे सर्व खटाटोप चाललेले असताना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट राष्ट्रवादी काँग्रेस मात्र दुरूनच हे सर्व सावकाशपणे बघत असून राज्यात विकासाचा पाळणा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा हळत आहे अशी टीकाही अशी शेलार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details