मुंबई- महापालिकेकडून सध्या इमारतींमध्ये जंतू फवारणी केली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. मुंबईत कोरोनाच्या चाचण्या देखील कमी करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे रुग्ण कमी सापडत आहेत, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. एक लाख अँटीबॉडी चाचण्या कराव्यात मग तुमचे सत्य पुढे येईल, असा टोला शेलार यांनी सरकारला लगावला आहे.
1 लाख अँटीबॉडी चाचण्या करा सर्व सत्य समोर येईल; आशिष शेलार यांचे सरकारला आव्हान - Mumbai corona cases
मुंबईत कोरोनाच्या चाचण्या देखील कमी करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे रुग्ण कमी सापडत आहेत, असा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढला,असेही शेलार म्हणाले.

नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्यावतीने 3 वाँर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत 57% तर इमारतीमध्ये 16% जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड झाले. खासगी लँबच्या सर्वेक्षणात सुमारे 25% लोकांना कोरोना होऊन गेलाय, म्हणजे 40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले?यात तुम्ही काय करुन दाखवले? असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विट करत सरकारला विचारला आहे.
झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढला. चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती तेव्हा वाढवली नाही.आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय..? यात तुम्ही काय करुन दाखवले?असा सवालही शेलार यांनी विचारला आहे.