महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्योगांचे स्वागत करण्यास महाराष्ट्राला उशीर का?; आशिष शेलार यांचा सवाल - mumbai latest news

बदलत्या आर्थिक परिस्थिती गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या सारख्या राज्यांनी तातडीने उद्योगांना रेड कार्पेट घालायला सुरुवात केलीय. महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरण ठरवण्यात मागे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

Adv.Ashish Shelar
अ‌ॅड.आशिष शेलार

By

Published : May 11, 2020, 2:37 PM IST

मुंबई-चीन सारख्या देशातून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र उशिर का करतोय? राज्याच्या अर्थकारण, रोजगार या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर केवळ एक कमिटी गठीत करुन "शासकीय लाल फितीत" का गुंडाळून ठेवताय? तातडीने निर्णय का घेत नाही, असे प्रश्न भाजप नेते आमदार अ‌ॅड.आशिष शेलार यांनी उपस्थितीत केले आहेत.

कोरोनामुळे जगातील औद्योगिक परिस्थिती विलक्षण बदलली असून संभाव्य मोठे बदल होणार हे लक्षात घेऊन गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या सारख्या राज्यांनी तातडीने उद्योगांना रेड कार्पेट घालायला सुरुवात केली. कारण लॉकडाऊन आणि कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने या बदलत्या परिस्थिती नुसार तातडीने बदल करत नवी धोरणे आखायला सुरुवात करताच उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांनी जुने कायदे बदलण्यात आघाडी घेतली. सध्याचे उद्योग टिकतील व नवे उद्योग आकर्षीत होतील असे नवे धोरण व पोषक वातावरण तयार करण्यास सुरुवात केलीय,असे आशिष शेलार म्हणाले.

वास्तविक महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र नेहमी सर्वात आधी पुढाकार घेतो पण यावेळी महाराष्ट्राने याबाबत उशीर केला आहे. अन्य राज्यांनी उद्योगांना रेड कार्पेट टाकल्यानंतर आपण आता कमिटी गठीत केली आहे. वास्तविक अन्य राज्यांची सुरू झालेली स्पर्धा पाहता यामध्ये झालेला कोणताही विलंब महाराष्ट्राचे मोठे नुकसान करणारा ठरणार आहे. त्यामुळे हा तातडीचा व अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून राज्य शासनाने या विषयात काम करणे आवश्यक आहे याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

राज्यातील उपलब्ध साधने, कायदे आणि बेरोजगार तरुणांची संख्या त्यांच्याकडे असणारे कौशल्य या सगळ्याचा सखोल विचार करुन नवे धोरण जाहीर करा, तसेच महाराष्ट्राची बाजू जागतिक औद्योगिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करा, अशी विनंती आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details