मुंबईमहाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये Asha Workers Demand काम करणाऱ्या 70000 अशा स्वयंसेविका व 4 हजार गटप्रवर्तक यांनी दिवाळीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेतन वाढ आणि बोनस द्यावा अन्यथा, आम्ही भाऊबिजेला त्यांच्याच घरी जाऊन धडकणार आहोत, असा इशारा दिलेला आहे.
Asha Workers : भाऊबीज आधी बोनसची ओवाळणी टाका, नाहीतर...; आशा वर्कर्सचा इशारा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Asha Workers Demand: महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये Asha Workers Demand काम करणाऱ्या 70000 अशा स्वयंसेविका व 4 हजार गटप्रवर्तक यांनी दिवाळीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेतन वाढ आणि बोनस द्यावा अन्यथा, आम्ही भाऊबिजेला त्यांच्याच घरी जाऊन धडकणार आहोत, असा इशारा दिलेला आहे.
वेतनवाढीसाठी आणि बोनससाठी मागणी राज्यातील दुर्गम भागात आदिवासी पाडे वस्ती डोंगराळ भागात अशा स्वयंसेविका सातत्याने जाऊन आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. महिलांचे बाळांतपण, महिलांना औषधोपचार त्या संदर्भातला सल्ला देणे अशी अनेक प्रकारचे काम आशा स्वयंसेविका करत आहेत. दरवर्षी त्या वेतनवाढीसाठी आणि बोनससाठी मागणी करतात. मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. याबाबत आरोग्य मंत्री यांनी ठोस उत्तर दिले नसल्याचे महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक स्वयंसेविका संघाचे नेते एम ए पाटील यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाक तर या आशा आरोग्य स्वयंसेविका यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधतांना शासनाने या आठवड्यात बोनस आणि वेतनरुपी ओवाळणी टाका, म्हणून भावाला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांना हाक दिली आहे.