महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Asa Ye Na : 'असा ये ना...'! एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी, प्रेक्षकांच्या भेटीला - Asa Ye Na marathi music video

एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ( soldier love story ) आहे. 'असा ये ना...', हा म्युझिक व्हिडिओ ( Asa Ye Na marathi music video ) लवकरच प्रदर्शित होत आहे. अंजली नान्नजकर आणि अमित डोलावत यांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jan 7, 2023, 5:52 PM IST

मुंबई : सामान्य माणसाप्रमाणेच सैन्यातील लोकांनाही भावना ( soldier love story ) असतात. भलेही त्यांचे आयुष्य खडतर असले तरी त्यांनाही प्रेम करण्याचा अधिकार असतो. अशीच एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी दिसणार आहे. 'असा ये ना...', या म्युझिक व्हिडिओ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले ( Asa Ye Na marathi music video ) आहे. या गुलाबी गाण्यात प्रेक्षकांना एका छोट्याशा हळूवार प्रेमकथेचाही अनुभव घेता येईल.

सैनिकाची लव्हस्टोरी :या गाण्यातून एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी सादर ( soldier love story ) केली आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाच्या स्वप्नातील हे गाणे आहे. या सैनिकाची पत्नी घरी आहे. पती सीमेवर देशाच्या रक्षणाची, तर पत्नी घरी संसार सांभाळण्याची जबाबदारी चोख बजावत असताना ते मनांच्या माध्यमातून दोघे एकत्र येतात आणि त्यातून हे गाणे तयार होते. या गाण्याचे शूटिंग सातारा येथे करण्यात आले आहे.

धरणी प्रोडक्शन्स :धरणी प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली ( Dharani Production ) निर्मात्या सुनीता नायक यांनी 'असा ये ना...' या गाण्याची निर्मिती केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी मोहन नामदेव राठोड यांनी सांभाळली आहे. 'असा ये ना...' हे गाणे गीतकार कौतुक शिरोडकर यांनी लिहिलं असून रोहित राऊत आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या सुमधूर आवाजात सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'असा ये ना...' या सुमधूर गाण्यात रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची अफलातून केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या गाण्याच्या निमित्तानं अभिनेत्री अंजली नान्नजकर आणि अभिनेता अमित डोलावत ( Anjali Nanjakar and Amit Dolawat ) यांना एकाच फ्रेममध्ये आणण्याची किमया दिग्दर्शक मोहन राठोड यांनी साधली आहे.


प्रेमाचे वेग वेगळे रंग :या गाण्यात प्रेमाचा एक वेगळाच रंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मोहन राठोड यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेलं 'मन काहूर...' हे गाणं खूप गाजलं आहे. याखेरीज 'दणका...' या धमाल गाण्यानं खरोखर दणका उडवला होता. 'मन धुंद पायवाट...' हे राठोड यांचं गाणं रसिकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणारं ठरलं. याखेरीज 'मेरा जहां...' या राठोड यांच्या हिंदी गाण्यानेही संगीतप्रेमींना ताल धरायला लावला आहे. आता 'असा ये ना...' हे रोमँटिक साँग रसिकांच्या भेटीला आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details