अंधेरीत गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम मुंबई : अंधेरीत २०१८ मध्ये येथील गोखले पूल कोसळून २ जणांचा तर २०१९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. दोन पूल कोसळून झालेल्या अपघातामुळे पालिकेने सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले. मात्र, रेल्वे हद्दीतील गोखले उड्डाणपूल धोकादायक असल्याने रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
वाहतूक विभागच्या सुचना : पालिकेच्या नियोजनानुसार ७ नोव्हेंबर २०२२ पासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे. आता हा उड्डाणपूल पश्चिम रेल्वेकडून पाडण्यात येणार आहे. रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने १० ते १५ जानेवारी या पाच दिवसांत तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तशा सुचनाही पालिकेच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
असा आहे मेगा ब्लॉक : १०,११, १२,१३ आणि १४ जानेवारी रोजी मध्य रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यत असणार असणार आहे. पश्चिम रेल्वेचा डाऊन धीम्या मार्गावर मध्य रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यत असणार आहे. तसेच अँप -डाऊन हार्बर मार्गावर रात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यत असणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. विलेपार्ले येथे दुहेरी थांबा मिळेल आणि प्लॅटफॉर्मच्या अभावी राम मंदिरात थांबणार नाही.
रात्रीच्या ट्रेनचे वेळापत्रक:विरार ते चर्चगेट रात्री 11.40 आणि अंधेरी ते चर्चगेट रात्री 12.46 ची लोकल गोरेगाव ते अंधेरी दरम्यान जलद मार्गांवरून धावणार आहे. ब्लॉक झाल्यानंतर अंधेरी ते विरार लोकल पहाटे 4.40 वाजता सुटणार आहे. या लोकल जलद मार्गांवरून चर्चगेट ते भाईदर रात्री 11.27, 11.38, 12.09, 12.16, 12.28, 12.43, अशा धावणार आहेत. नालासोपारा रात्री 11.46, बोरिवली रात्री 11.52, 1 वाजता, विरार रात्री 11.58, 12.20, 12.50, अंधेरी रात्री 12.31. असे वेळापत्रक आहे.
हेही वाचा : नशा करत निघाले रेल्वे रुळांवरून, जोरदार धडकेत तिघे जागीच ठार..