मुंबई -राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने ज्या प्रकारे कायदा केला आहे, त्याचा अभ्यास करुन कायदा लागू केला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (बुधवारी) दिली. हिंगणघाट येथे घडलेल्या जळीत कांडानंतर राज्यसरकारने हे नवे पाऊल टाकण्याचा विचार केला आहे. त्यासंबंधी गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्र प्रदेशला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
"महिलांवरील अत्याचारा विरोधात आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू" हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत..
गृहमंत्री म्हणाले, आंध्र प्रदेश सरकारने अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी ज्या प्रकारे कायदा केला आहे त्याची माहिती आम्ही घेणार आहोत. तसा कायदा राज्यात करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कायदेतज्ज्ञ, असे आम्ही लवकरच आंध्र प्रदेशला जाणार आहोत. त्यासाठी तेथे कशाप्रकारे अंमलबजावणी केली जात आहे आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास करुन राज्यातही असा कायदा लागू करता येईल का, असा राज्य सरकार विचार करत असल्याचे देशमुख म्हणाले.
हिंगणघाटच्या घटनेसंदर्भात देशमुख म्हणाले, की जी घटना घडली ती भयंकर आहे. मी स्वत: त्या पीडितेच्या उपचारासाठी नॅशलन बर्न सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरला घेऊन गेलो होतो, त्यांनी उपचारांसंदर्भात संबंधित डॉक्टरांना योग्य सूचना दिल्या आहेत. या पीडितेचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असून, हे या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हे न्यायालयात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची निवड केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा -औरंगाबादेत महिलेला घरात घुसून पेटवले, 95 टक्के भाजली