मुंबई- सत्तेसाठी शिवसेनेने विरोधी विचारधारा असणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यापासून दुरावला आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्याचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी व्यक्त केला आहे.
हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेपासून दुरावल्याने ती जागा मनसे भरून काढेल - राम कदम
मनसेची निर्मिती ही शिवसेनेतूनच झाली आहे. त्यामुळे, मनसेची विचारधारा काहीशी शिवसेनेच्या जवळ जाणारीच होती. आता सेनेपासून हिंदुत्ववादी मतदार दुरावल्याने ही पोकळी भरून काढण्याचा मनसेचा प्रयत्न असावा, असेही कदम यांनी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास गुप्त बैठक झाली आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर कदम यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. सध्या देशात भाजप हा सर्वात मोठा हिंदुत्ववादी पक्ष आहे. या पक्षाच्या नेत्यांना कुणी भेटले तर त्याचा राजकीय अर्थ काढू नये. अनेकदा ही वैयक्तिक स्वरूपाची भेटही असू शकेल. मात्र, हे खरे आहे की, मनसेची निर्मिती ही शिवसेनेतूनच झाली आहे. त्यामुळे, मनसेची विचारधारा काहीशी शिवसेनेच्या जवळ जाणारीच होती. आता सेनेपासून हिंदुत्ववादी मतदार दुरावल्याने ही पोकळी भरून काढण्याचा मनसेचा प्रयत्न असावा, असेही कदम यांनी सांगितले.
हेही वाचा-राज्यातील पंचायत समिती निवडणुकीमध्येही भाजपला धोबीपछाड; महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार