मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना मार्च आणि एप्रिलमध्ये ई-पॉस प्रणाली सुरू करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारच्यावतीने नव्याने ई पॉस प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेत राज्यात या महिन्यापासून मिळणाऱ्या रेशनसाठी अंगठा देणे गरजेचे नाही, असे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
राज्यात अनेक जिल्हे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्न धान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली आहे. अन्न धान्याचे योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकांनामध्ये शिक्षक तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती छगन भुजबळ दिली.
खबरदारी म्हणून रेशन घेताना ई-पॉस मशीनवर या महिन्यात अंगठा द्यायचा नाही - E pause machine
राज्यात अनेक जिल्हे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्न धान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली आहे. अन्न धान्याचे योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकांनामध्ये शिक्षक तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती छगन भुजबळ दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत वाटप होत असलेल्या लाभार्थ्यांचा ई पॉस मशीनवर अंगठा घेण्यात येतो. ई पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा देतांना व वाटप करणाऱ्या दुकानदारांचा जवळून संपर्क येत असल्याने कोरोनाचा संसर्ग तसेच संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. ई पॉसवर अंगठा घेतांना सोशल डिस्टंन्स पाळणे खूप कठीण होईल व संसर्ग होण्याचा धोका खूप वाढू शकतो. या अनुषंगाने धान्य घेण्याकरीता येणाऱ्या शिधापत्रिकाधारक यांचा मशिनवर अंगठा न घेता त्यांचा रेशनकार्ड नंबर घेण्याची रास्त भाव दुकानदारास मुभा देण्यात आली आहे.