महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : आज मला उपस्थित राहता येणार नसल्याने पुढील तारीख द्या; शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीची एसआयटीकडे मागणी - aryan khan drugs case and puja dadlani news

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे फोनवरील संभाषण मी ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू, त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा साईलने केला आहे.

Aryan Khan case
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण

By

Published : Nov 8, 2021, 3:15 PM IST

Updated : Nov 8, 2021, 6:19 PM IST

मुंबई -आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाची तपास करण्याकरिता मुंबई एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या टीमच्या समोर प्रभाकर साईल यांनी आपले जबाब नोंदवला आहे. आता पुढील जबाब नोंदवून याकरिता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आज उपस्थित राहण्याचा समन्स पाठवले होते. मात्र, आज उपस्थित राहता येणार नाही. मला पुढील तारीख देण्यात यावी, अशी मागणी पूजा ददलानीने मुंबई एसआयटीकडे केली आहे.

प्रभाकर साईलचे आरोप काय -

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचे फोनवरील संभाषण मी ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू, त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा साईलने केला आहे. आपण के. पी. गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईलने केला. यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितले. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या. 1 ऑक्टोबरला रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

हेही वाचा -गोसावीच्या सेल्फीमुळे सगळे पैसे गेले; कथित प्रत्यक्षदर्शी विजय पगारेच्या दाव्याने खळबळ

हॅकर मनीष भंगाळेचे दावे आणि गौप्यस्फोट -

यापूर्वी एका सायबर तज्ञाने आणि हॅकरने दावा केला होता की, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यासाठी पूजा ददलानीसह काही लोकांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स एडिट करण्यासाठी दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनीष भंगाळे असे या हॅकरचे नाव आहे. दाखवलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची बॅकअप फाइल आर्यन खानच्या नावावर असल्याचा दावा भंगाळे यांनी केला होता. प्रभाकर साईलच्या नावाने बनावट सिमकार्ड बनविण्यास सांगितले होते, असा मोठा दावा हॅकर मनीष बंगाळेने केला होता. जळगावात 6 ऑक्टोबरला आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या दोघांनी माझ्याशी संपर्क साधला होता. यासाठी मला पाच लाख रुपयांची ऑफरही देण्यात आली होती. तसेच जबरदस्तीने 10 हजार रुपयेही देण्यात आले होते, असे दावे भंगाळेंनी केले होते.

मनीष भंगाळेंचं अमित शहा, वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र -

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये प्रभाकर साईलबद्दलच्या बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनीष भंगाळे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मनीष भंगाळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसंच महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे. भंगाळे म्हणाले, आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या या दोघांनी मला सांगितले की, तू भारतातील प्रसिद्ध हॅकर आहेस. तुमच्याकडे आमचं एक विशेष काम आहे. त्यांनी मला काही नंबर दिले आणि सांगितले की आम्हाला त्यांचा सीडीआर हवा आहे. त्या सर्व क्रमांकांपैकी एक नंबर पूजा ददलानी या नावाने सेव्ह करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअ‍ॅप चॅटची बॅकअप फाईल दाखवली आणि त्या फाईल्स एडिट करण्यास सांगितल्या. त्यानंतर त्यांनी मला एक मोबाइल नंबर दिला आणि या नंबरवर कॉल करण्यास सांगितलं आणि जेव्हा मी तो नंबर ट्रूकॉलरवर पाहिला तेव्हा हा नंबर काही सॅमचा होता.

Last Updated : Nov 8, 2021, 6:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details