मुंबई - मालमत्ता करमुक्त करण्याच्या वचनात शिवसेना मागे हटली नाही. मात्र, शासनाच्या काही पद्धती असतात, त्यामुळे लगेचच ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमुक्त करण्याची अंमलबाजवणी झाली नाही. पण पुढच्या काळात हे वचन पूर्ण होईल असा आशावाद शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.
५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमुक्त करण्याचे आश्वासन शिवसेना पूर्ण करेल - अरविंद सावंत - Property tax
500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमुक्त करण्याची अंमलबाजवणी झाली नाही. पण पुढच्या काळात हे वचन पूर्ण होईल असा आशावाद शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.
शिवसेनेने ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ते पूर्ण न केल्याने, सेनेला मतदान करू नका, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी केले. यावर सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेना दिलेले आश्वासन पूर्ण करते. राज्याच्या नगरविकास विभागाने ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्री मंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र, काही शासकीय अडचणी असल्यामुळे या निर्णयाची अजून अंमलबाजवणी सुरू झाली नसल्याची कबुली सावंत यांनी दिली. पण पुढच्या काळात शिवसेना आपले वचन पूर्ण करेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात केवळ सामन्य कर रद्द होणार आहे. मालमत्ता कर रद्द होणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकी दरम्यान शिवसेनेने मालमत्ता कर रद्द करू असे म्हटले होते. मग त्यांनी जनतेची फसवणूक का केली?असा सवाल मिलिंद देवरा यांनी उपस्थित केला.