मुंबई - यंदाच्या वर्षी आज (रविवार) झालेले सूर्यग्रहण हे शतकातील महत्त्वाचे सूर्यग्रहण होते. हे सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसत होते. काही भागात कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसले. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडत आहे. या सूर्यग्रहणाबद्दल नेहरू प्लॅनटोरिअमचे संचालक अरविंद परांजपे यांनी ईटीव्ही भारतला सविस्तर माहिती दिली...
हरू प्लॅनटोरिअमचे संचालक अरविंद परांजपे हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेकजण उत्सूक होते. ही घटना डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हे सूर्यग्रहण पाहताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन खगोलशास्त्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.
सूर्यग्रहणाबद्दलची अंधश्रद्धा पाहता यासाठी काय करावं?
1. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूर्यग्रहण पाहताना सनग्लासचा उपयोग आवश्यक आहे.
2. झाडांच्या पानातून पडणाऱ्या प्रकाशाच्या मदतीने झाडांच्या सावलीत देखील ग्रहण पाहता येईल. जमीनीवर पडणाऱ्या सावलीत ग्रहणाची प्रतिमा पाहता येईल.
3. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता त्याऐवजी वेल्डिंगसाठी वापरला जाणारा 13 किंवा 14 नंबरच्या चष्म्याचा उपयोग करावा.
काय करु नये
1. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करु नये. असं केल्यास याचा डोळ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
2. सूर्यग्रहण पाहताना काचेवर कोणत्याही प्रकारच्या सनग्लास, गॉगल किंवा एक्स-रे शिटचा उपयोग करू नये.
3. सूर्यग्रहणाची सावली पाण्याच्या पृष्ठभागावर पाहणे देखील धोकादायक आहे. तसं करणं टाळावं.