मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली होती. विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोठ बांधण्यासाठी अरविंद केजरीवाल हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट :उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जनता दलाचे नेते नितीश कुमार आले होते. त्यांच्या पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपविरोधात एकजूट करुन लढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडे भेटीकडे देशातील विरोधी पक्षातील नेते नजर ठेऊन होते. आज अरविंद केजरीवाल हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याने सगळ्यांचे या भेटीत काय निर्णय होते, याकडे लक्ष लागले आहे.
शरद पवार विरोधी पक्षांचा चेहरा :शरद पवार यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विरोधी गटाच्या नेत्यांचा चेहरा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी शरद पवार यांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी पुढाकारही घेतला होता. आता शरद पवार यांच्या भेटीला अरविंद केजरीवाल आल्याने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शरद पवार अरविंद केजरीवाल यांच्या भेटीत नेमके काय धोरण ठरते, याकडे राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे.
दुपारी होणार अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांची भेट :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांची दुपारी तीन वाजता भेट होणार आहे. याबाबतची माहिती काल अरविंद केजरीवाल यांनी दिली होती. अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याने विरोधकांनी या भेटीवर चांगलीच टीका केली आहे.
हेही वाचा -
- coal mine mishap : सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट, ११ कामगार जखमी, दोन जण गंभीर
- HSC Results 2023 : विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली; गुरुवारी बारावीचा निकाल, 'असा' करा चेक
- PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत