महाराष्ट्र

maharashtra

Arunachal CM Visit CSMT Station : अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्र्यांकडून सीएसएमटी स्थानकाचे कौतुक

By

Published : Dec 18, 2022, 9:39 AM IST

अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्र्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाला भेट ( Prem Kumar Khandu visit CSMT station  ) दिली. यावेळी त्यांनी लोकलचा अनुभव घेतला. सर्व गोष्टी पाहून त्यांनी सीएसएमटी स्थानक व्यवस्थापनाचे कौतुक ( Appreciate CSMT Station Management ) केले. ट्विटर द्वारे त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Arunachal Chief Minister
प्रेमकुमार खंडू

मुंबई :नुकतेच छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाला अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री प्रेम कुमार खंडू यांनी भेट ( Prem Kumar Khandu visit CSMT station ) दिली. सीएसएमटी स्थानकाचे व्यवस्थापन पाहून त्यांनी गौरवोद्गार ( Appreciate CSMT Station Management ) काढले. इथले व्यवस्थापन जागतिक दर्जाचे आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या प्रतिक्रियेला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर प्रतिसाद दिला. त्यात भविष्यात सीएसएमटी कसे असेल याचे काही नवीन फोटो देखील त्यात ट्विटरवर अपलोड केले.

ऐतिहासिक वारसा स्थळ :छत्रपती शिवाजी टर्मिनसची आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून ओळख ( CSMT Historical Heritage Site ) आहेच. तसेच प्रचंड लोकसंख्या ह्या स्थानकात रोज प्रवासासाठी ये जा करते. नदीला पूर यावा तसा जनतेचा ओघ सुरू असतो. मध्य रेल्वेच्या मार्गावर रोज सुमारे 40 लाख लोक प्रवास करतात. याचे कारण लोकल ट्रेनचे व्यवस्थापन प्रणाली हे होय.

कसे असते हे व्यवस्थापन : सुरक्षा कारणास्तव फारसे जिथे जाऊ दिले जात नाही. अश्या कॉन्ट्रोल रुममधून क्षणो क्षणी मेल एक्स्प्रेस ट्रेन आणि लोकल ट्रेनची अद्ययावत माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना प्राप्त होते. एकाच वेळी 100 पेक्षा अधिक कर्मचारी 24 तास जागता पहारा ह्या वार रूम सारख्या सभागृहात कार्यमग्न असतात. लोकल ट्रेन चालक किंवा गार्ड काहीही झाले तर येथे संपर्क करतात. तिथून मग योग्य त्या विभागाला सुचना मिळते. त्यानंतर जनसंपर्क विभागाशी संबंधित असेल तर तिकडे कळवले जाते. त्यानंतर प्रसारमाध्यमांना कळवले जाते. समाज माध्यमावर सुचना प्रसिद्ध केली जाते.

कंट्रोल रूमला भेट दिली : ह्या कंट्रोल रूमला देखील प्रेम कुमार खंडू यांनी भेट ( Arunachal CM Visit CSMT Station ) दिली. तिथले व्यवस्थापन समजून घेतले. त्यामुळे ते सगळे काम पाहून प्रभावित झाले. रेल्वेच्या विविध अधिकारी मंडळींना ते भेटले मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारींनी त्यांना भेटवस्तू म्हणून सीएसएमटी स्थानकाचे चित्र दिले. त्यावेळी त्यांनी म्हटले की,"मुंबईतील प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील जागतिक दर्जाचे व्यवस्थापन खरोखरच कौतुकास्पद आहे. दररोज तब्बल 10 लाख प्रवाशांची गर्दी असलेल्या या गजबजलेल्या स्थानकाला भेट देण्याची संधी मला मिळाली. एक अनुभव कायम स्मरणात राहील."ही भावना त्यांनी ट्विटरवर देखील व्यक्त केली. त्याला प्रतिसाद देताना रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी ट्विटद्वारे उत्तर देत आभार मानले. आणि भविष्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस कसे असेल त्याचे नवीन अनोखे फोटो देखील दर्शविले.

ABOUT THE AUTHOR

...view details