मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या निरव मोदीला अटक केल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येऊ शकते, या विषयाचा अहवाल राज्य तुरुंग प्रशासनाने केंद्राला पाठविला आहे. आर्थर कारागृहातील बराक नंबर 12 मध्ये निरव मोदीची व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता आहे.
निरव मोदीला भारतात आणल्यास, 'या' कारागृहात ठेवण्यात येणार - पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या निरव मोदीला अटक केल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येऊ शकते, या विषयाचा अहवाल राज्य तुरुंग प्रशासनाने केंद्राला पाठविला आहे. आर्थर कारागृहातील बराक नंबर 12 मध्ये निरव मोदीची व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता आहे.

निरव मोदीला कारागृहात 'या' मिळणार सुविधा -
आर्थर कारागृहातील बराक नंबर 12 ही सर्वाधिक सुरक्षित कोठडी असून या कोठडीत पुरेसा सूर्य प्रकाश, हवा आणि शुद्ध पाण्याची सोय करून देण्यात आली आहे. निरव मोदी याला कारागृहात ठेवल्यास त्याच्या मागणीनुसार लाकडी पलंग देण्यात येणार आहे. मोदी याला त्याच्या मागणीनुसार दिवसभरात 1 तासाहून अधिक वेळ कोठडी बाहेर येऊन व्यायाम करण्यासाठी परवानगीसुद्धा देण्यात येणार आहे.
आर्थर रोड कारागृहातील 12 नंबरची बराक हा सीसीटीव्हीच्या देखरेखीत आहे. यामुळे हा बराक सुरक्षित समजला जाते. त्यामुळे निरव मोदीला याच बराकमध्ये ठेवण्यात यावे असा अहवाल राज्य तुरुंग प्रशासनाने केंद्राला पाठवला आहे.